General Register
सर्व शिक्षक बांधवांना
नमस्कार ! मित्रांनो आपण सर्व शिक्षक आहात आणि एक शिक्षक म्हणून काम करत असताना
अध्यापनाबरोबरच ऑफिस चे देखील काम आपण करत असतो. ऑफिस च्या कामात आपल्या
अध्यापनाचा बहुतांश वेळ खर्च होतो. वारंवार दाखला , बोनाफाईड मागणीसाठी पालक येतात
आणि आपली अध्यापणाची लिंक तुटते आणि बराच वेळ लेखनात जातो , यासाठी कमी वेळात
विद्यार्थी बोनाफाईड , शाळा सोडल्याचा दाखला , किंवा इतर विद्यार्थी माहिती तयार
करता यावी यासाठी हे General
Register आपणास हमखास उपयोगी पडेल याची मला
खात्री आहे.
General Register हे मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2016 मध्ये बनवलेले offline डेटाबेस सॉफ्टवेअर आहे जे वापरण्यास अगदी सोपे आहे . यासाठी
आपल्या संगणकात मायक्रोसॉफ्ट ऑफिस चे , 2010 , 2013, 2016 किंवा त्यापुढील व्हर्जन असणे आवश्यक आहे.
वैशिष्ट्ये :
1 . मायक्रोसॉफ्ट अॅक्सेस
2016 मध्ये बनवलेले असल्याने वापरण्यास अगदी सोपे आहे.
2. विद्यार्थ्याचा शाळा
सोडल्याचा दाखला , बोनाफाईड दाखला अगदी कमी वेळेत तयार करता येईल. शाळा सोडल्याचा
दाखला मराठी अंक आणि इंग्रजी अंकात तयार होईल.
3. नवीन विद्यार्थ्याचा
शाळा प्रवेश फॉर्म पालकांच्या प्रतिज्ञा पत्रासह कमी वेळेत तयार करता येईल व
प्रिंट काढून त्याची फाइल करता येईल .
4. शाळेतील जनरल रजिस्टर
नमुन्याप्रमाणेच यामध्ये जनरल रजिस्टर तयार होईल त्याची प्रिंट देखील काढता येईल.
5. अनेक विद्यार्थ्यांमधून
ज्या विद्यार्थ्याची माहिती पहावयाची आहे त्या विद्यार्थ्याची माहिती एका क्लिक
मध्ये पाहता येईल.
6. सर्व विद्यार्थ्यांची
माहिती एकत्र पाहता येईल.
7. सर्व विद्यार्थ्यांच्या
पालकांची माहिती एका क्लिक वर पाहता येईल.
8. चालू शैक्षणिक वर्षातील
कोणत्याही तारखेची इयत्ता निहाय पटसंख्या, जातवार पटसंख्या , वयोगट निहाय पटसंख्या
, मुले , मुली , बीपीएल विद्यार्थी , अपंग विद्यार्थी , अल्पसंख्यांक विद्यार्थी ,
त्यांची नावे , यादी एका क्लिक वर पाहता येईल, प्रिंट करता येईल , pdf करता
येईल.
9 कोणत्याही तारखेस
अनुसरून सर्व विद्यार्थ्यांचे वय काही सेकंदात काढता येईल.
10 . शाळेत विविध कामासाठी
, वरिष्ठ कार्यालयाकडील विविध कामासाठी , वेगवेगळ्या विद्यार्थी याद्या Report या टॅब मधून तयार करता येतील.
11 . विद्यार्थी गणवेश
यादी , इयत्तानिहाय विद्यार्थी संपर्क क्रमांक यादी , आधार नंबर यादी , बँक
क्रमांक यादी बनवता येईल. प्रिंट करता
येईल किंवा pdf बनवता येईल.
13 . इयत्तानिहाय
विद्यार्थी पुढच्या वर्गात प्रमोट करता येतील.
14 . सॉफ्टवेअर मधील आपण
भरलेली सर्व माहिती Excel
Format मध्ये save करून ठेवता येईल .
15 . सर्व माहिती Excel फाइल मध्ये तयार करून ती या सॉफ्टवेअर मध्ये इम्पोर्ट करता
येईल.
16 . सॉफ्टवेअर चा Backup दोन पद्धतीने घेता येईल . AutoBackup आणि Manual Backup
17 . आकर्षक Design आणि
सहज वापरता येईल.
आवश्यक बाबी :
1. हे सॉफ्टवेअर व्यवस्थित run होण्यासाठी
आपल्या संगणकात मायक्रोसॉफ्ट ऑफिस 2010,2013,2016 किंवा पुढील व्हर्जन असणे
आवश्यक.
2. या सॉफ्टवेअर मधील डेटा व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्या संगणकात Utsaah फॉन्ट असणे आवश्यक आहे जो या सॉफ्टवेअर च्या डाउनलोड फाइल मधील Font या फोल्डर मध्ये आहे. तो install करूनच सॉफ्टवेअर run करावे.
कसे घ्याल ? :
General
Register हे सॉफ्टवेअर आपण फक्त रु. 99/- मध्ये घेवू शकता . त्याची वैधता
एक वर्ष असेल . यासाठी खालील स्टेप्स Follow करा –
1. सर्व प्रथम खाली
दिलेल्या लिंक वरून आपल्या संगणकातील मायक्रोसॉफ्ट
ऑफिस च्या व्हर्जन (2010,2013,2016 )
नुसार सॉफ्टवेअर डाउनलोड करून त्यातील Utsaah फॉन्ट install करा आणि सॉफ्टवेअर मधील सूचना वाचून मगच सॉफ्टवेअर run करा.
General Register For MS office 2010 x32 - Download
General Register For MS office 2013 x32 - Download
General Register For MS office 2016 x32 - Download
2. खाली दिलेला बारकोड स्कॅन करून फोन पे वरून रु.99/- पे करा किंवा इतर डिजिटल माध्यमातून पे करा.
3. आपण पे केलेल्या रकमेचे
डिटेल्स जसे TransactionID
,Reference etc. ची माहिती Fill Google Form या गूगल फॉर्म
मध्ये भरा आणि सबमिट करा. बँक डिटेल्स, otp
पाठवू नये.
4. गूगल फॉर्म सबमिट केल्यानंतर एक तासात आपणास गूगल फॉर्म मध्ये दिलेल्या whatsapp मोबाईल नंबर वर आपणास टेक्स्ट मेसेज द्वारे अॅक्टिवेशन Keyपाठवली जाईल.
5. अॅक्टिवेशन Key प्राप्त
झाल्यानंतर आपल्या सॉफ्टवेअर मध्ये ती Key
एंटर करून सॉफ्टवेअर अॅक्टिवेट
करा आणि फुल अॅक्सेस ने वापरा.
सॉफ्टवेअर कसे वापराल ?
सॉफ्टवेअर कसे वापरावे या
संबंधी माहिती मिळवण्यासाठी खालील विडियो पहा आणि सॉफ्टवेअर संबंधी अपडेट
मिळवण्यासाठी...................YOU TUBE Channel
ला subscribe करा.
(video is not yet available, it will be available soon ...)
समस्या निवारण कसे कराल ?
General
Register वापरसंबंधी कोणत्याही समस्ये संदर्भात माहिती मिळवण्यासाठी,
समस्या निवारण साठी या .... .....................WhatsApp
ग्रुप ला जॉइन व्हा .
महेश धायगुडे

